Sun Marathi मनोरंजन विश्वात एक नवीन मालिका घेवून येत आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला Actor अशोक फळदेसाई या नव्या मालिकेत दिसणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं‘ या नव्या मालिकेतून एका नव्या प्रेमकथेचा रोमांचक प्रवास सुरु होतोय. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या प्रोमोला भरभरून, उत्स्फूर्त, सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या प्रोमोमध्ये तेजाचं रांगडं व्यक्तिमत्त्व, आणि वैदेहीच्या प्रेमासाठी त्याची धडपड पाहून प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशोक फळदेसाई या भूमिकेत नव्या लूक आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससह समोर येत असून त्याचं हे रुप पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे, त्याच बरोबरीने वैदहीच्या भूमिकेत एका सशक्त, ठाम आणि बोलक्या स्वभावाच्या तरुणीच्या रूपात प्रेक्षकांची मनं जिंकायला Actress अनुष्का गीते सज्ज आहे. लवकरच प्रेक्षकांना प्रेमाची नवीन परिभाषा ‘Tuzyasathi Tuzyasang‘ मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
पहिल्या नजरेतल्या प्रेमाची नाजूक, निरागस आणि मनाला स्पर्श करणारी एक अनोखी कहाणी या मालिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.तेजा (अभिनेता अशोक फळदेसाई) आणि वैदेही (अभिनेत्री अनुष्का गीते) ही जोडी अनुक्रमे नायक नायिकेच्या रुपात या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.जिद्दी, प्रेमळ, बंडखोर पण मनाने अत्यंत सच्चा अशा विरोधाभासाने भरलेला तेजा आणि ठाम, आत्मविश्वासू आणि बेधडक वैदेही असा प्रेमाचा हा सामना रंगणार आहे.

Sun Marathi मुख्य पात्र आणि त्यांचे कलाकार
तेजा – प्रमुख नायक, तडफदार आणि तणावांनी भरलेला प्रेम व्यक्त करणारा युवक. हे पात्र अभिनेता अशोक फळदेसाई यांनी साकारले आहे. त्याने यापूर्वी “जीव झाला येडापिसा” मालिकेतील शिवा म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला होता.
वैदेही – प्रमुख नायिका, जिची वैद्यकीय/शैक्षणिक पार्श्वभूमी असून तेजाच्या अनोख्या पद्धतीवर प्रारंभी संशय दाखवते. ही भूमिका अनुष्का गीते (Anushka Gite) हिने साकारली आहे. यापूर्वी “उदे गं अंबे” मालिकेत ठळक भूमिका निभावली आहे.
Sun Marathi Official Websiteकथा आणि थीम
Sun Marathi वरील ही मालिका पहिल्या नजरेतील प्रेमाची नाजूक, निरागस आणि भावनांना समोर आणणारी एक प्रेमकथा आहे. तेजा सच्चा, प्रेमळ पण बंडखोर; वैदेही ठाम, आत्मविश्वासी, आणि प्रामाणिक — या दोघांच्या विरोधाभासी स्वभावांचा संघर्ष व प्रेमाचा प्रवास कथानकात रंगणार आहे. प्रोमोत तेजा आणि वैदेही यांच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांची भावनिक गुंफण दिसते. ज्यामुळे प्रेक्षकांची मालिका पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
मांडणी आणि सादरीकरण
अशोक फळदेसाईचा नवीन लूक आणि स्क्रीन प्रेझेन्स खूपच आकर्षक आहे. त्याच्या या लुकबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चासुद्धा आहे. अनुष्का गीतेच्या भूमिकेतील व्यक्तिमत्त्वानेही प्रेक्षकांची मनं पटकन जिंकली आहेत.
थोडक्यात
Sun Marathi वाहिनीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही एक नवी रंगीबेरंगी प्रेमकथा आहे जिथे तेजा आणि वैदेही यांच्या पहिल्या भेटीपासून प्रेमाच्या प्रवासापर्यंतच्या संघर्षाची गुंफण भावनात्मक प्रकारे सादर केली गेली आहे. अशोक–अनुष्का यांची नवी जोडी आणि त्यांचे व्यक्तिमत्व या मालिकेला एक वेगळेच आकर्षण देतात.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया
प्रोमोला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. उत्स्फूर्त, सकारात्मक प्रतिसाद सोशल प्लॅटफॉर्मवरून दिसून येत आहे. तेजा–वैदेही जोडीसाठी चाहत्यांचा उत्साह व अपेक्षा दोन्हीही खूप वाढलेल्या दिसतात.
अशोक फळदेसाई – थोडक्यात ओळख ( परिचय)
जन्म व शिक्षण
अशोक फळदेसाई चा जन्म गोव्यात 25 June 1990 रोजी झाला. त्याने गोवा येथील S.S. Angle महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील लालित कला केंद्रातून थिएटरमध्ये MA पदवी घेतली.
थिएटर व अभिनय प्रवास – त्याने भारतीय MIME थिएटरच्या राष्ट्रीय मंचावर काम केले आहे.
TV Serials प्रसिद्ध भूमिका
2019 मध्ये ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत त्याची ‘शिवा लष्करे’ या प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी त्याने अंदाजे 8–10 किलो वजन वाढवून स्थानिक कोल्हापुरी बोली शिकली. 2021 मध्ये मालिका संपल्यानंतर त्याने हिंदी मालिका ‘Mehndi Hai Rachne Waali’ आणि ‘Kasturi’ (2023) मध्ये काम केले.
नवीन टीव्ही मालिका
2023-24 साली त्याने ‘निवेदिता माझी ताई’ मालिकेत यशोधनची भूमिका साकारली.
वैयक्तिक आवड व जीवनशैली
मी सकाळी लवकर उठून workout करतो. माझ्या फिटनेसच्या बाबतीत मी अत्यंत सिरियस आहे असे त्याने सांगितले.
अभिनेत्री अनुष्का गीते चा परिचय –
अनुष्का गीते ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक उत्कंठावर्धक आणि आकर्षक Actress आहे. ती TV मालिकांसह मराठी चित्रपटांमध्येही काम करत असून, तिच्या अभिनयामुळे ती घराघरांत पोहोचली आहे.
मराठी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी तिने थिएटरमध्येही अभिनयाचा अनुभव घेतला आहे. भावनात्मक आणि सोपे पात्र आतापर्यंत तिने साकारले आहेत. तसेच ती विविध भूमिकांमध्ये सहजतेने स्वतःला सादर करते.
ती सोशल मिडियावर नेहमी उत्साही असते. आपल्या चाहत्यांना ती आपल्या पुढच्या प्रोजेक्ट्सबद्दल नियमितपणे माहिती देत असते.
Sun Marathi वरील new serial ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद देणार ना? तसेच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला comments द्वारे कळवायला विसरू नका.
https://entertainmentkida.com/
तुझ्यासाठी तुझ्यासंगं मालिका पाहा Sun Marathi वर