Ye Re Ye Re Paisa ‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; Salman Khan, Mahesh Manjrekar यांच्या उपस्थितीत Official टायटल साँगचा Exclusive धमाकेदार लाँच

Ye Re Ye Re Paisaयेरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा 2’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे Title Song नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता Salman Khan आणि Mahesh Manjrekar याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी संगीताला उर्जा आणि झिंग दिली आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले आहे. Ye Re Ye Re Paisa 3 या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून यंदाचा भाग आणखीन धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही.

marathi comedy - ye re ye re paisa 3

Ye Re Ye Re Paisa 4 मध्ये काम करण्याची इच्छा Salman Khan ने व्यक्त केली

या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल Salman Khan म्हणतो, ‘’ हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात Ye Re Ye Re Paisa 4 मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.’’

या म्युजिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “Ye Re Ye Re Paisa 3 ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.”

Follow us on Facebook entertainmentkidamarathi

निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणाले, “Salman Khan ने वेळात वेळ काढून आमच्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहाणं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या Title Song च्या माध्यमातून चित्रपटाची धमाल झलक प्रेक्षकांसमोर आली आहे, आता चित्रपटगृहात पूर्ण धमाका अनुभवायला मिळेल.”

Dharma Production चे अपूर्व मेहता म्हणाले, “मराठी सिनेमाची गुणवत्ता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. Ye Re Ye Re Paisa 3 हा एक परिपूर्ण मनोरंजनपट असून आम्ही याचा भाग झाल्याचा आनंद आहे.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

marathi comedy movie - ye re ye re paisa 3

कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, Siddharth Jadhav, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. Ye Re Ye Re Paisa 3 चे Energetic Title Song पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Ye Re Ye Re Paisaये रे ये रे पैसा‘ ही एक लोकप्रिय मराठी विनोदी चित्रपटमालिका आहे. या मालिकेच्या आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत.

या दोन्ही चित्रपटांमध्ये मनोरंजन, गोंधळ, विनोदी प्रसंग आणि गुन्हेगारीची हलकीफुलकी मांडणी पाहायला मिळते.

Follow us on Instagram entertainmentkida_marathi

Ye Re Ye Re Paisa (भाग 1) 🎬
  • प्रदर्शन: 5 January 2018
  • दिग्दर्शक: संजय जाधव
  • निर्माता: अमेय विनोद खोपकर & Team
  • कलाकारांची नावे – उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, बिजॉय आनंद, मृणाल कुलकर्णी, तुषार दळवी, आनंद इंगळे, किशोर कुमार
Ye Re Ye Re Paisa (भाग 2) 🎬
  • प्रदर्शन: 9 August 2019
  • दिग्दर्शक: हेमंत ढोमे
  • निर्माता: ओमप्रकाश भट्ट, स्वाती खोपकर & Team
  • कलाकारांची नावे – संजय नार्वेकर, अनिकेत विश्वासराव, मृण्मयी गोडबोले, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, प्रियदर्शन जाधव, रोहित कडूदेशमुख, स्मिता गोंदकर, महेश मांजरेकर, विशाखा सुभेदार

Ye Re Ye Re Paisa या चित्रपटाचा पहिला Teaser नुकताच Social Media वर झळकला असून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Ye Re Ye Re Paisa हास्याची हास्याचे कारंजे, अ‍ॅक्शनचा धमाका आणि मनोरंजनाची पूर्ण खात्री देणारा हा चित्रपट 18 July 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत नक्की पाहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका

https://entertainmentkida.com/

#UmeshKamat #tejaswinipandit #videopalace #YeReYeRePaisa3

Leave a Comment