All Is Well ‘फूल्ल 2 मनोरंजन’ करणा-या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचा Official धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

All Is Well ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या 27 जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात  प्रकाशित झाला.  तीन मित्रांची धमाल Chemistry ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय.  प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

marathi movie - All Is Well Trailer

All Is Well trailer launch प्रसंगी बोलताना Producer अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच co-producer मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी  म्हणाले की, काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. प्रेक्षकांना  enjoy करता येईल अशा कथानकाच्या शोधात असताना  लेखक  प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक  योगेश जाधव आणि  कार्यकारी निर्माते संजय ठुबे  यांच्या सहकार्याने  हा धमाल विषय आम्ही आणला आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘All Is Well’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास सर्व निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक योगेश जाधव  म्हणाले की,  ‘एवढ्या कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा  चित्रपट करता आला याचा खूप आनंद आहे. निखळ हास्याची मेजवानी देणारा हा  चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

All Is Well या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल  ट्रेलर  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर या अशा कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काहीतरी धमाल घडवणार हे दाखवतोय. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन चित्रपटातून दिसणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.

ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश,अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा किर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

‘ऑल इज वेल’ हा 27 June 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा मराठी Comedy-Drama चित्रपट आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सतर्फे निर्मित, याचे दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले असून कथा–संवाद प्रियदर्शन जाधव यांचे आहेत.

group photo - All Is Well

Watch on YouTube

All Is Well कथारचना आणि थीम

फिल्मच्या केंद्रस्थानी आहे अमर, अकबर आणि अँथनी – तीन मित्रांची धमाल, जीवनातील अप्रत्यक्षित वळणं आणि अडथळ्यांवर मात करत त्यांच्या मैत्रीचा प्रवास

ट्रेलरमध्ये ATM चोरी, घोटाळ्यांचे गोंधळ आणि तीन मित्रांची मस्तीपूर्ण एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

Follow us on YouTube – @rajshrimarathi
प्रमुख कलाकार आणि पात्रे All Is Well

प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर – या त्रिकुटाची केमिस्ट्री कथानकाला ऊर्जा देते

सयाजी शिंदे – ‘आप्पा’ या भाईच्या भूमिकेत, मराठी भाषेत शुद्ध अतिशय प्रभावी शैलीत चित्रित

माधव वझे – हा चित्रपट त्यांचा शेवटचा अभिनय म्हणून विशेष गौरवयोग्य;  त्यांच्या स्मरणार्थ चित्रीकरण अनुभव भावूक बनवतो

इतर सहकलाकारांमध्ये अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांचा समावेश आहे

All Is Well तंत्रज्ञ आणि टीम

निर्माते: अमोद मुचंडीकर, वाणी हलप्पनवर

सह निर्माते: मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी

कार्यकारी निर्माता: संजय ठुबे

संगीत: चिनार-महेश, अर्जुन जन्या

छायांकन: मयुरेश जोशी

संपादन: अथश्री ठुबे

गीतकार: मंदार चोळकर

कलादिग्दर्शन : नितीन बोरकर (ऑल इज वेलमध्ये सयाजी शिंदे यांच्या शैलीची खास जबाबदारी)

ट्रेलर लॉन्चमध्ये निर्माते व दिग्दर्शकांनी “निखळ हास्याची मेजवानी प्रेक्षकांना नक्की आवडेल” अशी आशा व्यक्त केली.

श्रद्धांजलि – माधव वझे यांची शेवटची अभिनयदृष्टी म्हणून, टीमने त्यांच्या आठवणी साजर्‍या केल्या.

जर तुम्हाला हलक्या विनोदावर आधारित सामाजिक कथानक, मस्ती आणि धमाल पाहायची असेल, तर हा चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे.

चर्चेच्या उतरत्या म्हणीप्रमाणे (“तीन तिघाडा काम बिघाडा” बदलून “खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग”) होतयं का?  हे All Is Well चित्रपटात पाहावं लागेल

https://entertainmentkida.com/

AllIsWell​ #AllIsWellTrailerOutNow​ #AllIsWellInCinemasFrom27June​ #marathimovie #entertainmentkida #newmovie #comedy

Leave a Comment