Bollywood Movie Sant Tukaram संत तुकाराम यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘संत तुकाराम‘ या हिंदी सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात मराठी अभिनेता Subodh Bhave मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा First Look ही समोर आला आहे. याबरोबरच ‘संत तुकाराम‘ सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
Bollywood Movie Sant Tukaram संत तुकाराम या चित्रपटाद्वारे अभिनेते सुबोध भावे यांचे Bollywood मध्ये पदार्पण
Bollywood Movie Sant Tukaram ‘संत तुकाराम‘ सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे तुकारामांच्या लूकमध्ये दिसत आहे. हातात वीणा घेऊन अभंग गात असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. “एक वाणी, एक विश्वास, एक संत तुकाराम महाराज“, असं म्हणत सुबोधने त्याच्या सोशल मीडियावरुन ‘संत तुकाराम‘ सिनेमाचं Poster Share केलं आहे. या पोस्टरवर कमेंट करत चाहत्यांनी सिनेमासाठी उत्सुकता दर्शवली आहे. ‘संत तुकाराम‘ सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केलं आहे. तर बी.गौतम कर्झन फिल्म्स आणि पुरशोत्तम स्टुडिओज यांची निर्मिती आहे. येत्या 18 July ला ‘संत तुकाराम’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
दरम्यान, याआधी संत तुकाराम यांची गाथा सांगणारे मराठी सिनेमे येऊन गेले आहेत. तुकाराम आणि संत तुकाराम या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. जितेंद्र जोशी ने तुकाराम सिनेमात निभावलेली संत तुकारामांची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. आता सुबोध भावेला संत तुकारामांच्या भूमिकेत Bollywood Movie Sant Tukaram पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Follow us on Instagram entertainmentkida_marathiBollywood Movie Sant Tukaram कलाकारांची नावे:
सुबोध भावे – संत तुकाराम
ट्विंकल कपूर, शीना चौहान, मानवीर चौधरी, हेमल धारिया, अरुण गोविल, मोहम्मदफराज़ खान, मुकेश खन्ना, अकबर सामी, गौरी शंकर, बृजेश्वर सिंह, आरजे राहुल सिंह, शिव सूर्यवंशी

संत तुकाराम – एक नवा अध्याय, नव्या भाषेत!
- मराठी संतपरंपरेतील तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आता Bollywood मध्ये हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामुळे या चित्रपटाचा आवाका केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारतभर पोहोचणारा ठरणार आहे.
- यामध्ये Subodh Bhave प्रमुख भूमिकेत झळकणार असून, हे त्यांचं Grand Bollywood Debut मानलं जात आहे. त्यांची अभिनयशैली, संत तुकारामांच्या भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या हृदयात नक्कीच स्थान मिळवेल.
- या चित्रपटामुळे तुकाराम महाराजांचे आदर्श, अभंगरचना, भक्तीमूल्यं आणि जीवनदर्शन हे सर्व एका नव्या शैलीत, नव्या सादरीकरणात उलगडणार आहेत. पारंपरिक कीर्तन, अभंग आणि संतचरित्र ऐकलेल्यांसाठीही हा अनुभव ताज्या दृष्टीकोनाने समृद्ध करणारा ठरेल.
- विशेष म्हणजे, आजच्या पिढीला संत तुकारामांचे विचार आधुनिक चित्रणातून समजून घेण्याची संधी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
- ज्यांनी संतांची शिकवण मनापासून स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट एक भावनिक आणि आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

सुबोध भावे यांची कारकिर्द –
सुबोध भावे यांची कारकिर्दी खूपच बहुआयामी आणि समृद्ध आहे. मराठी सिनेमा, नाटक, दूरचित्रवाणी, आणि हिंदी सोबतच Mallyalam film इंडस्ट्रीत काम करून त्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
जन्म आणि शिक्षण:
- जन्म: 9 November 1975, Pune
- शिक्षण: सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पुणे; त्यानंतर M.com पूर्ण केले.
- सुरुवात: पुण्यातील एक छोट्या आयटी कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करत होते, नंतर अभिनयाकडे वळले.
🎬 महत्त्वाचे चित्रपट:
वर्ष | चित्रपट |
2008 | सनई चौघडे |
2009 | एक डाव धोबीपछाड |
2010 | हापूस |
2011 | बाल गंधर्व |
2012 | Aiyyaa (हिंदी) |
2013 | बालक पालक |
2015 | कट्यार काळजात घुसली |
2015 | लोकमान्य एक युगपुरुष |
2018 | आणि….डॉ. काशिनाथ घाणेकर |
2025 | His Story of Itihaas (हिंदी) |
🎭 महत्त्वाची नाटके
कळा या लागल्या जीवा, लेकुरे उदंड झाली, धुक्यात हरवली वाट, मुले चोर पकडतात (बालनाट्य), अश्रूंची झाली फुले, स्थळ स्नेह मंदिर
📺 – TV मालिका
आभाळमाया, अवंतिका, दामिनी, वादळवाट, अवघाची संसार, अभिलाषा, ह्या गोजिरवाण्या घरात, कळत नकळत, कुलवधू, का रे दुरावा, तुला पाहते रे, चंद्र आहे साक्षीला
🏅🏆पुरस्कार आणि सन्मान
- Filmfare Marathi पुरस्कार (2016) – दिग्दर्शक, कट्यार काळजात घुसली
- महाराष्ट्र राज्य व इतर स्थानिक पुरस्कार – बाल गंधर्व आणि लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटांसाठी
- लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर(2019) – सर्वोत्तम अभिनेता चित्रपट (आणि….डॉ. काशिनाथ घाणेकर)
- अभिनय क्षेत्रात २५ वर्ष पूर्ण केल्याने सत्कार – मराठी साहित्य परिषद पुणे
वैयक्तिक आयुष्य:
- पत्नी: मंजिरी (बालमैत्रीण), मुलं: कान्हा आणि मल्हार
- लेखक म्हणून अनुभव – पुस्तक ‘घेई छंद’ प्रकाशित
Bollywood Movie Sant Tukaram मधून Bollywood movies मध्ये पदार्पण करणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्याला entertainment kida कडून खूप खूप शुभेच्छा..
https://entertainmentkida.com/
मग नक्की पाहा Bollywood Movie Sant Tukaram ‘संत तुकाराम‘ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका