Comedy मराठी चित्रपट ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार Official Trailer release, प्रथमेश – प्रियदर्शिनीची fresh जोडी या चित्रपटामध्ये झळकणार

Comedy, thriller आणि रहस्य यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक marathi चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर 1760’ ची.  तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा trailer नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि Comedy ने भरलेला हा trailer सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर 1760’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे 4 July ला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं Comedy असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके आणि Comedy वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.”

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर 1760’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट entertainment बरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. ज्यात Comedy देखील आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.”

gadi no 1760 cast - comedy

चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Comedy आणि हरहुन्नरी अभिनेता प्रथमेश परब याच्याविषयी थोडक्यात

प्रथमेश परब याचा जन्म 29 November 1993 रोजी झाला. प्रथमेश परब हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक चमकदार आणि बहुविध प्रतिभावंत कलाकार आहे. त्याने विविध भाषांमध्ये भूमिका बजावून आपली कला सिद्ध केली आहे. Comedy व्यक्तिरेखा तसेच भूमिका साकारण्यात त्याचा हातखंडा आहे.

🎬 महत्त्वाचे चित्रपट
वर्षचित्रपटभूमिका
2013बालक-पालक (Balak Palak)विशू
2014टाइमपास (Timepass)दगडू शांताराम परब
2015Timepass 2दगडू शांताराम परब
2015Drishyamजोस (हिंदी)
2015उर्फी (Urfi)देवा
201635 % Kathavar Passसाईराज
2016लालबागची राणी (Lalbaugchi Rani)अँडी
2018Khajoor Pe Atkeरॉकी दिलवाला (हिंदी)
2019टकाटक (Takatak)ठोके
2020डॉक्टर डॉक्टर (Doctor Doctor)केशव (किश्या)
2022टाइमपास 3 (Timepass 3)दगडू शांताराम परब
2022टकाटक 2 (Takatak 2)
2022Drishyam 2जोस (हिंदी)
2023Taaza Khabar (वेब सीरिज)राजा चतुरवृत्ती उर्फ पीटर
2024Hoy Maharajaराम्या
2024Shri Ganesha
2025मुक्काम पोस्ट देवाचं घर (Mukkam Post Devach Ghar)

🎬 हिंदी चित्रपट :

त्याने Drishyam (2015) आणि Drishyam 2 (2022) मध्ये जोस नावाच्या Comedy पात्रात भूमिका केली.

Follow us on Facebook entertainmentkidamarathi

Actress प्रियदर्शनी इंदलकर विषयी थोडक्यात (जन्म – 19 June 1997)

प्रियदर्शिनी इंदलकर ही मराठी चित्रपटसृष्टी तसेच SONY मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘फुलराणी‘, ‘सोयरिक‘ आणि ‘नवरदेव B.Sc. Agri.‘ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

👧 लहानपण आणि शिक्षण

प्रियदर्शिनी इंदलकर हिचा जन्म सांगली येथे झाला आणि पुढील शिक्षण पुणे येथे झाले

तिची खास ओळख म्हणजे ती “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या SONY मराठीवरील लोकप्रिय Comedy कार्यक्रमामधून घराघरात पोहोचली आहे. ती आपल्या विनोदी अभिनयशैलीसाठी ओळखली जाते, परंतु तिने चित्रपटांतूनही विविध भूमिका साकारून तिच्या अभिनयातील विविधता सिद्ध केली आहे.

gadi no 1760 song - comedy

तसेच या चित्रपटातील प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला‘ गाणं देखील प्रदर्शित

प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या स्पंदनांना आणि गोड अनुभवांना स्पर्श करणारं हे गाणं प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

या गाण्याला आशीष कुलकर्णी याचा सुरेल आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दांनी गाणं अधिकच खुलून आलं आहे. गाण्याला मधुर आणि भावनिक संगीत दिलं आहे समीर सप्तीसकर यांनी, जे प्रेमभावनेला एका सुंदर चालीत गुंफून प्रेक्षकांच्या मनात झनकार निर्माण करतं. ‘झननन झाला’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन पवन-बॉब यांनी केलं आहे.

Follow us on Instagram entertainmentkida_marathi

Comedy, thriller आणि रहस्य यांचा मिलाफ असणारा हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत नक्की पाहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका

https://entertainmentkida.com/

#GaadiNumber1760 #गाडीनंबर१७६० #prathameshparab #saregamamarathi #latestmarathisong

Leave a Comment