Kannappa “कन्नप्पा” हा तेलुगू भाषेतील पौराणिक Outstanding Action-Drama चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला release on June 27 2025…

Kannappaकन्नप्पा” हा एक आगामी भारतीय Telugu भाषेतील पौराणिक ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले असून, मोहन बाबू यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदू धर्मातील भगवान शिवाचे भक्त कन्नप्पा यांच्या दंतकथांवर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विष्णू मांचू (Vishnu Manchu)झळकणार आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीत भक्ती, समर्पण आणि देवावरच्या प्रेमावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मात्र, अशा चित्रपटांमध्ये आपल्या दैवतासाठी आपले प्राणही अर्पण करणाऱ्या भक्ताची गोष्ट फारच थोडी वेळा समोर आली आहे. येणारा Telugu चित्रपट “कन्नप्पा” ही अशीच एक कथा आहे – भक्ती, शौर्य आणि निस्सीम विश्वासाने भरलेली.

Kannappa दंतकथेविषयी सविस्तर

Kannappa कन्नप्पा, ज्याला तमिळ भाषेत कन्नप्पा नयनार असेही म्हणतात, हा भगवान शंकराचा एक महान भक्त होता. तो एक शिकारी होता आणि त्याचे मूळ नाव थिन्नन होते. वनात शिकारी करताना त्याला एक शंकराची मूर्ती सापडली, आणि त्याच्या मनात त्या मूर्तीबद्दल गाढ भक्ती निर्माण झाली. पारंपरिक पूजाअर्चेचे ज्ञान नसतानाही त्याने आपल्या पद्धतीने शंकराची सेवा केली. एक वेळ अशी आली की, त्याने भगवान शंकरासाठी आपले डोळेही अर्पण केले. त्याच्या या अतुलनीय भक्तीमुळे त्याला “कन्नप्पा नयनार” म्हणून ओळख मिळाली.

bollywood telugu trailer - kannappa

Kannappa movie निर्मितीचा प्रवास

भगवान शिवाचे भक्त असलेल्या Kannappa यांच्या खऱ्या कथेनुसार आधारित असलेला हा चित्रपट प्रत्यक्षात यायला जवळपास एक दशक लागले.

या चित्रपटाची मूळ कथा अभिनेता, पटकथालेखक आणि दिग्दर्शक tanikella bharani यांची आहे. December 2013 मध्ये तनिकेला भरणी यांनी ‘भक्त कन्नप्पा‘ या 14 व्या शतकातील पौराणिक चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर काम करत असल्याचे सांगितले होते. मात्र, निर्माता न मिळाल्यामुळे भरणी यांनी ही कथा विष्णू मांचू यांना विकली.

Follow us on Instagram entertainmentkida_marathi

Kannappa चित्रपटविषयी आणखी माहिती:
  • 18 August 20223 रोजी श्रीकालहस्ती येथील श्रीकालहस्तीश्वर मंदिरात पूजा विधी करून चित्रपटाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं.
  • दिग्दर्शनाची जबाबदारी मुकेश कुमार सिंग यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी याआधी अनेक पौराणिक टीव्ही मालिका दिग्दर्शित केल्या आहेत.
  • चित्रपटाची निर्मिती विष्णू मांचूंचे वडील मोहन बाबू यांनी त्यांच्या 24 Frames Factory आणि AVA Entertainments या बॅनरखाली केली आहे.
  • मुख्य चित्रिकरण 25 September 2023 पासून New Zealand येथे सुरू झाले.
कलाकारांचा जबरदस्त ताफा

मुख्य भूमिका:

  • विष्णू मांचू – थिन्नाडू उर्फ कन्नप्पा, अव्रम मांचू – लहान थिन्नाडू, मोहन बाबू – महादेव शास्त्री
  • आर. शरतकुमार, मधू (Madhoo), मुकेश ऋषी, ब्रह्माजी, करुणास, ब्रह्मानंदम, रघू बाबू, ऐश्वर्या भास्करन, प्रीती मुखुंदन, देवराज, लवी पजनी, शिव बालाजी, अर्पित रांका, सम्पत राम, कौशल मंढा, सुरेखा वाणी, सप्तगिरी

🌟 विशेष उपस्थिती – Kannappa चित्रपटातील चमकदार कमिओ रोल्स 🌟

  • मोहनलाल किरात
  • प्रभास – प्रचंड उर्जेचा अवतार, रुद्र रूपात – एक विस्फोटक आणि प्रभावी झलक
  • अक्षय कुमारभगवान शिव यांच्या भूमिकेत, पहिलाच तेलुगू चित्रपट
  • काजल अग्रवालदेवी पार्वती च्या भूमिकेत
🎵 सर्व गाणी स्टीफन देवासी Stephen Devassy यांनी संगीतबद्ध केली आहेत.
Follow us on Facebook entertainmentkidamarathi

हा चित्रपट बहुभाषिक असणार आहे आणि तेलुगू व्यतिरिक्त Hindi, Tamil, Kannada आणि Mallyalam भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

कन्नप्पा चित्रपटाची पूर्वनियोजित प्रदर्शनाची तारीख ही 25 April 2025 होती. हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये डब करून प्रदर्शित होणार होता. मात्र, VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) च्या upgradation साठी आणि पोस्ट-प्रॉडक्शनमधील अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब झाला.

या चित्रपटात उच्च दर्जाचे VFX तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे आपणांस भव्यदिव्य देवळे, मोठे युध्दाचे प्रसंग, तसेच अनेक दृश्ये VFX च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने पाहता येतील.

vishnu manchu akshay kumar movie - kannappa

Kannappa का पाहावा?
  • एक प्रेरणादायी भक्ताची कथा
  • प्रभास, अक्षय कुमार, मोहनलाल यांसारख्या दिग्गजांची झलक
  • भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा संगम
  • भव्य सेट्स, अद्वितीय संगीत, उच्च दर्जाचे VFX तंत्रज्ञान आणि भावनिक कथा
विशेष माहिती

Cannes Film Festival 2024 दरम्यान Kannappa चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, जो प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त टाळ्यांची दाद मिळवून गेला.

जर तुम्ही अध्यात्म, इतिहास, आणि भक्ती यांची सांगड घालणारे चित्रपट पाहणे पसंत करत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक पर्वणी ठरेल!

देवासाठी प्राणही अर्पण करणाऱ्या या भक्ताची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला नुसती प्रेरणा नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि निस्सीम विश्वासाची जिवंत जाणीव करून देणारी ठरेल – अशी कथा जी काळाच्या पलिकडे जाऊन हृदयात घर करेल.

https://entertainmentkida.com/

मग नक्की पाहा Kannappa कन्नप्पा हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका.

#Kannappa27thJune #KannappaTrailer #Kannappa

Leave a Comment