Maa Movie ‘माँ’ हा एक आगामी हिंदी भाषेतील Mythological horror film असून, दिग्दर्शक विशाल फुरिया यांचे दिग्दर्शन असलेली ही एक भन्नाट कथा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आईच्या मायेवर आधारित अनेक चित्रपट आले, पण Maa हा चित्रपट या सर्वांहून वेगळा ठरणार आहे. हा चित्रपट एक पौराणिक हॉरर पार्श्वभूमी, एका आईचा अलौकिक शक्तींशी संघर्ष आणि तिच्या अतूट मायेचा भावनिक प्रवास यांचं हे थरारक मिश्रण आहे.
विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध अभिनेत्री Kajol हिचा हा पहिलाच horror शैलीतील चित्रपट आहे आणि ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काजोलने यापूर्वी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, पण ‘माँ‘ मधील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वात भावनिक आणि वेगळी ठरणार आहे.
चित्रपटाचे कथानक आणि माहिती
‘माँ’ ही एक आई आणि तिच्या मुलीची कहाणी आहे. पण ही केवळ प्रेमळ नाते सांगणारी कथा नाही, तर त्या नात्यासाठी केलेल्या लढ्याची गाथा आहे. जी आपल्या मुलीला अलौकिक शक्तींपासून वाचवण्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडण्यास तयार असते.
‘माँ’ हा चित्रपट ‘शैतान’ या सुपरनॅचरल युनिव्हर्सचा पुढचा भाग असून, आध्यात्मिक थरार आणि भावनांची विलक्षण सांगड घालतो.
Maa चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे आणि Jio studios यांनी केली आहे, तर कुमार मंगत पाठक यांनी सह-निर्मिती केली आहे.

🎥 दमदार स्टारकास्ट
या चित्रपटात केवळ काजोल च नाही, तर रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, गोपाल सिंग, सूर्यसिखा दास, Yaaneea Bharadwaj, रूपकथा चक्रवर्ती आणि Kherin Sharma यांच्यासारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
Maa 27 June 2025 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि बंगाली भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
🎼 संगीत:
- चित्रपटातील संगीत दिलं आहे हर्ष उपाध्याय, रॉकी खन्ना आणि शिव मल्होत्रा यांनी, तर गाणी लिहिली आहेत प्रणव वत्स आणि मनोज मुंतशिर यांनी.
- गायक म्हणून Usha Uthup, Shreya Ghoshal आणि Jubin Nautiyal यांनी आपल्या सुरेल आवाजाचा साज या चित्रपटातील गाण्यांना चढवला आहे.
🌟 एका वेगळ्या संकल्पनेचं भावनिक दर्शन
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक खास गोष्ट दिसली – कलाकारांनी आपल्या नावासोबत आईचं नाव जोडले आहे.
- अजय देवगण – अजय वीणा देवगण
- विशाल फुरिया – विशाल रेवंती फुरिया
- काजोल – काजोल तनुजा मुखर्जी
ही संकल्पना प्रेक्षकांच्या काळजात खोलवर खोलवर रूजते — कारण आई ही केवळ जन्मदात्री नसून, ती प्रत्येक संकटाच्या, प्रत्येक भयाच्या मुळाशी उभी असते — ढाल बनून, सावलीसारखी, न मिटणाऱ्या शक्तीप्रमाणे.
🎭 अभिनेत्री काजोल देवगण – हिंदी सिनेमाची यशस्वी अभिनेत्री
Kajol Devgan (पूर्वाश्रमीची काजोल मुखर्जी) – 5 August 1974 रोजी जन्म
- तिने आतापर्यंत 6 Filmfare पुरस्कार पटकावले आहेत, ज्यापैकी 5 वेळा ‘Best Actress’चा किताब मिळवणं हा एक उल्लेखनीय विक्रम मानला जातो.
- 2011 साली Government Of India ने तिला ‘पद्मश्री’ या देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले — जो तिच्या अभिनयातील अभिजाततेला आणि योगदानाला दिलेला मान आहे.
Kajol ही तनुजा आणि शोमू मुखर्जी यांची कन्या आहे. तिने 1992 मध्ये ‘बेखुदी‘ या चित्रपटातून शालेय शिक्षण घेत असतानाच अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तिने शिक्षण सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
Follow us on Instagram entertainmentkida_marathiKajol यांचे गाजलेले निवडक चित्रपट
वर्ष | चित्रपट | विशेषता |
1992 | बेखुदी | Debut Film |
1993 | बाज़ीगर | पहिला यशस्वी चित्रपट |
1994 | ये दिल्लगी | |
1995 | करण-अर्जुन | |
1995 | दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे | फिल्म फेअर Best Actress |
1997 | गुप्त | फिल्म फेअर Best Villain |
1997 | इश्क | |
1998 | कुछ कुछ होता है | फिल्म फेअर Best Actress |
2001 | कभी खुशी कभी ग़म | फिल्म फेअर Best Actress |
2006 | फना | फिल्म फेअर Best Actress |
2010 | माय नेम इज़ खान | फिल्म फेअर Best Actress |
2015 | दिलवाले | सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट |
2020 | तान्हाजी: द अनसंग वॉरिअर | सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट |
📺 डिजिटल विश्वातील कामगिरी:
काजोलने OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपली छाप पाडली आहे.
- ‘त्रिभंग’ (2021)
- ‘द ट्रायल’ (2023)
- ‘दो पट्टी’ (2024)

💍 खाजगी आयुष्य:
1999 मध्ये Kajol ने अभिनेता आणि चित्रपट निर्माता Ajay Devgan शी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.
व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळणारी काजोल ही खऱ्या अर्थाने आजच्या काळातील प्रेरणादायी स्त्री आहे.
👩👧👦 आईच्या मायेपुढे कोणतंही भय टिकत नाही…
Maa म्हणूनच ‘माँ’ ही एक अनुभवण्यासारखी कहाणी आहे, जी तुमच्या काळजात घर करून जाईल!
https://entertainmentkida.com/
मग नक्की पाहा Maa ‘माँ‘ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका.