Metro In Dino 2025 –शहरातील गुंतागुंतीच्या प्रेमकथांचा Beautiful अनुभव!

Metro In Dino Bollywood मध्ये काही चित्रपट असे असतात जे आपल्या हृदयाचा ठाव घेतात, आणि “Life in a… Metro” (2007) हा त्यापैकीच एक. आता तब्बल 18 वर्षांनंतर, Director Anurag Basu आपल्या खास शैलीत, नव्या भावनांनी नटलेला “मेट्रो… इन दिनो” (Metro In Dino) हा त्याचा पुढील भाग घेऊन आलेला आहे. – आणि हो, ही केवळ एक कथा नाही, तर आपल्या आजच्या शहरजीवनाची प्रेमगाथा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून Anurag Basu यांनी पुन्हा शहरातील प्रेम, विरह आणि भावनांना गवसणी घातली आहे.

Metro In Dino चित्रपटाबद्दल विशेष माहिती

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन Anurag Basu यांनी केले असून हा चित्रपट T-Series फिल्म्स व Anurag Basu Production यांची संयुक्त निर्मिती आहे.

Metro In Dino कथानक – शहरी प्रेमाच्या अनेक छटा

या चित्रपटात एक नाही, दोन नाही तर चार हृदयस्पर्शी शहरी प्रेमकथा आहेत. या कथा वेगवेगळ्या महानगरांमध्ये घडतात – मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू – पण शेवटी या सर्व कथा एकमेकांशी भावनिक धाग्यांनी जोडल्या जातात. एकाच वेळी अनेक शहरी प्रेमकथांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना नात्यांमधील गुंतागुंत, भावना आणि बदलते संबंध यांचे वास्तवदर्शी चित्रण करून देतो.

Metro In Dino Star Casts

Metro In Dino कलाकारांची जबरदस्त फळी

चित्रपटात एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत:

या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फज़ल आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कलाकाराचे नावचित्रपटातील भूमिकेचे नावकलाकाराविषयी माहिती
अनुपम खेरपरिमल500+ चित्रपटांचा अनुभव; गंभीर व विनोदी अभिनयात पारंगत.
नीना गुप्ताशिबानी; संजीवची पत्नी; काजोल आणि चुमकीची आई‘बधाई हो’ फेम; टीव्ही व सिनेमांत सशक्त भूमिका
कोंकणा सेन शर्माकाजोल; माँटी ची बायकोराष्ट्रीय पुरस्कार विजेती; वास्तववादी अभिनयासाठी प्रसिद्ध.
पंकज त्रिपाठीमाँटी सिसोदिया; काजोलचा पती‘Mirzapur’ तसेच ‘Stree’ चित्रपटांतील बहुआयामी भूमिकांसाठी ओळख.
आदित्य रॉय कपूरविशाल चौधरी‘आशिकी 2’ फेम; तरुणांमध्ये लोकप्रिय चेहरा.
सारा अली खानचुमकी‘केदारनाथ’पासून प्रसिद्धी; बिनधास्त आणि Social Meida अ‍ॅक्टिव्ह.
फातिमा सना शेखसपना सक्सेना चौधरी; आकाशची पत्नी‘दंगल’मधील दमदार भूमिका; संवेदनशील अभिनय.
अली फजलआकाश‘फुकरे’, ‘Mirzapur’ फेम; Hollywood मध्येही काम केलेले.
सास्वता चॅटर्जीसंजीव, शिबानीचे पती; काजोल आणि चुमकीचे वडील

🧑‍🎤 विशेष म्हणजे अनुराग बसू आणि इम्तियाज अली या दोन दिग्दर्शकांची कॅमिओ झलक देखील यात पाहायला मिळेल!

Follow us on Instagram entertainmentkida_marathi

🎬 चित्रपट निर्मितीचा प्रवास

या चित्रपटाची अधिकृत घोषणा December 2022 मध्ये झाली आणि मुख्य चित्रीकरण February 2024 मध्ये पूर्ण झाले. Shooting भारतातील विविध शहरांमध्ये – Delhi, Mumbai, Kolkata, Lucknow आणि Himachal प्रदेशातील बारोग रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले.

हे सर्व लोकेशन्स केवळ पार्श्वभूमी नसून, त्या कथा उलगडण्याचे महत्वाचे भाग आहेत.

🎵 संगीत

चित्रपटाचे संगीत Pritam यांनी दिले असून त्यांनी 2007 मध्ये Life in a… Metro साठी देखील संगीत दिले होते. आता पुन्हा Metro In Dino च्या माध्यमातून त्यांची जादू अनुभवायला मिळणार आहे.

🎧 या चित्रपटासाठी Arijit Singh, Shashwat Singh, Vishal Mishra, Raghav Chaitanya, Papon, Sachet Tandon, Akasa Singh, Shreya Ghoshal अशा एकाहून एक मातब्बर गायकांनी गाणी गायली आहेत.

🎤 खास: Anupam Kher आणि Aditya Roy Kapur यांनी स्वतः काही गीते गायली आहेत.

Metro In Dino Directors

💰 बॉक्स ऑफिस कामगिरी

सुरुवातीला हा चित्रपट 29 November 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी अधिक दर्जेदार फिनिशिंगसाठी प्रदर्शन तारीख पुढे ढकलली.

हा चित्रपट 4 July 2025 ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे एकूण budget 47 Crore रुपये असून आतापर्यंत या चित्रपटाने 34 Crore रुपये कमावले आहेत.

🎬 का पाहावा Metro In Dino?
  • दमदार कलाकार मंडळी
  • प्रितमचं हृदयस्पर्शी संगीत
  • शहरी नात्यांचं वास्तव दर्शन
  • अनुराग बासूचं संवेदनशील दिग्दर्शन
  • प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद

Follow us on Facebook entertainmentkidamarathi

Metro In Dino केवळ एक चित्रपट नाही, तर तो एक आरसा आहे, जिथे प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःचीच झलक दिसेल. आजच्या डिजिटल, धावपळीच्या जीवनात जिथे नातेसंबंध क्षणिक होतात, तिथे हा चित्रपट प्रेमाचा स्थायित्व शोधतो – अशा कथा सांगतो ज्या ‘आपल्या’सारख्या वाटतात. प्रत्येक कहाणीचं एक नातं असतं – शहराशी, वेळेशी, किंवा स्वतःशीच.

👉 Modern relationships आणि हृदयाला भिडणाऱ्या कथा पाहायच्या असतील, तर “Metro In Dino” नक्की पहा! ❤️ आपल्या जवळच्या सिनेमागृहांत आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका.

https://entertainmentkida.com/

#MetroInDino

Leave a Comment