Sajana “सजना” ही प्रेमावर आधारित कथा असून, ही गोष्ट ग्रामीण पार्श्वभूमीवर घडते, जिथे प्रेमातल्या भावना, संघर्ष आणि त्याग दाखवला आहे. चित्रपटात ग्रामीण जीवनशैली, नात्यांचे बारकावे, आणि सामाजिक भावभावना यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळेल.
हा चित्रपट म्हणजे जणू Camera आणि कॅनव्हासची जादुई भेट, जिथे दृश्यांना कवितेचा स्पर्श आणि प्रत्येक क्षणाला चित्रकलेचं सौंदर्य लाभलं आहे.
Sajana Movie विषयी महत्त्वाचे
🎥 दिग्दर्शक आणि निर्माते: शशिकांत धोत्रे
शशिकांत धोत्रे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि संवाद लेखक सुद्धा आहेत. ते एक बहुपेडी भूमिकेत या चित्रपटात काम करत आहेत, ज्यातून त्यांच्या कल्पकतेची झलक दिसते.
शशिकांत धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर (ता. मोहोळ) सारख्या छोट्याशा गावातून आलेले, पण आज जगभरात आपल्या अप्रतिम Visual Art साठी ओळखले जाणारे एक अफलातून कलाकार आहेत.
चित्रकलेच्या कॅनव्हासवर रंग उधळणाऱ्या या प्रतिभावान कलाकाराने आता “Sajana” या पहिल्या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि स्थानिक संवेदनांवर आधारलेला असून प्रेक्षकांना भावनिक आणि सौंदर्यपूर्ण अनुभव देणारा ठरणार आहे.
तसेच Sajana हा चित्रपट 27 June 2025 पासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.

Sajana Movie StarCast🎭 कलाकार मंडळी:
या चित्रपटात स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे. हा प्रयत्न ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याचा आहे.
- Akash Sarvgod – सजना (अभिनयात खऱ्या प्रेमाच्या भावनेची खोली दाखवली)
- Trupti More – वंदना (नाजूक पण ठाम दिसणारा भावुक अभिनय)
- Sambhaji Pawar – दिन्या (प्रेमात अडथळे निर्माण करूनही संवेदनशीलता जपणारा अभिनय)
- Prachi Palve – आक्की
- Shital Chavan – लक्षी
- Mahesh Kshirsagar – सूर्या
- Abhay Chavan – वंदना Brother
🎞️ कथानक (Story):
“सजना” एक ग्रामीण पार्श्वभूमीवरील रोमँटिक-ड्रामा आहे जिथे निरागस प्रेम – एक तरुण जोडपी Vandana आणि Sajana यांच्या प्रेमकथेची सुंदर सुरुवात.
त्यांच्या प्रेमामुळे जाती व्यवस्था असलेल्या या गावात तणाव वाढतो. त्यातच एका हट्टी प्रतिस्पर्ध्यामुळे त्याचं प्रेम कसोटीला लागतं. भावनिक तणाव, विवाद, विरोधकाचा हस्तक्षेप – त्यांच्या नात्यावर अनेक अडथळे येतात. अशा या पार्श्वभूमीवर त्यांची ही भावपूर्ण यात्रा बनते आशेची, जिद्दीची आणि एकमेकांसोबत राहण्यासाठी दिलेल्या संघर्षाची प्रतीक.
चित्रपटाची अंदाजे २ तास २० मिनिटांचा असून, या चित्रपटात सहा गाणी आहेत.
🎶चित्रपटाचे संगीत आणि गाणी:
भुंगा music च्या बॅनरखाली Omkar Swaroop यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. Sonu Nigam, Adarsh Shinde, Anand Shinde यांसारख्या गायकांची गाणी या चित्रपटातून पाहायला तसेच ऐकायला मिळत मिळतील.
🎶 ‘रात सजनाची’ गीत – ‘रात सजनाची’ हे प्रमुख रोमँटिक गाणं आहे, ज्यात नवविवाहितांच्या पहिल्या रात्रीतील स्पर्श, भावना आणि स्वप्नांची सुंदर चित्रमयता रंगवली आहे. या गाण्याचे प्रमुख लेखक सुहास मुंडे, संगीतकार ओंकारस्वरूप, आणि गायिका प्रियांका बर्वे तथा ओंकारस्वरूप यांनी योगदान दिले आहे.
“मोहळ उठलं, अंग माखलं… ही रात सजनाची” – या अशा romantic ओळींनी प्रेमाच्या मुलायम आणि भावनिक सुरात रंगवलेल्या रात्रीचे दृश्य उलगडले आहे.
Follow us on Facebook entertainmentkidamarathi🎬 चित्रपटाची टीम:
- दिग्दर्शक, निर्माता व लेखक: शशिकांत धोत्रे
- संगीतकार: Onkarswaroop
- नृत्यदिग्दर्शक: Ranju Varghese
- गायन: Sonu Nigam, Adarsh Shinde
- छायाचित्रण: रंजीत माने
- संपादन: वैभव दाभाडे
- साउंड डिझायनर: अविनाश सोनावणे
🎬 शूटिंग स्थळ:
चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण सोलापुरात करण्यात आले असून स्थानिक ग्रामीण भागाच्या नैसर्गिक दृश्यांचा समावेश केला आहे.

🎯 विशेष वैशिष्ट्ये:
- “सजना” या चित्रपटाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांसाठी एक नवे कलादालन खुले झाले आहे, जिथे ग्रामीण महाराष्ट्रातील सुप्त प्रतिभांना हक्काचे व्यासपीठ लाभले आहे.
- चित्रपटाची ग्रामीण पार्श्वभूमी व भावनिक हाताळणी
- लेखक-दिग्दर्शक-निर्माता – एकाच व्यक्तीकडून
- प्रेक्षकांना नवलाईचा अनुभव देणारा एक संपूर्ण प्रेमकथा चित्रपट
- संगीत – आवाजात गुंतवून ठेवणारे
Sajana हा चित्रपट म्हणजे जणू संवेदनशीलतेचा रंगमंच, जिथे कलाकार, कथा आणि कॅमेरा – तिघांचं सुरेख समन्वय अनुभवायला मिळतो.
“सजना” ही एक भावविश्वात खोलवर रुतलेली प्रेमकहाणी आहे. ग्रामीण पार्श्वभूमीत बुजलेल्या प्रेमाच्या नैसर्गिक गोडीने सिनेमा रंगलेला आहे. प्रिय व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्या आणि तिला जपण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाच्या प्रवासाची ही कथानक आहे.
दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांच्या सखोल कलादृष्टीने कलाकारांना केवळ अभिनय नव्हे तर सौंदर्य, लयबद्धता आणि विचारशीलता यांची समृद्ध अनुभूती दिली आहे.
classic प्रेमकथा, thriller, ग्रामीण सौंदर्य आणि संघर्ष यांचा मिलाफ असणारा हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहांत नक्की पाहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया comments द्वारे कळवायला विसरू नका.
https://entertainmentkida.com/
#Sajana #marathimovie #InCinemas27June “अतुट प्रेमाची गोष्ट !” 💕❤️